कोरोनासंबंधी आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान..

0
123

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, राज्यातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी रेटवर भर दिला. राज्यातील रिकव्हरी रेट हा ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांचा ‘डबलिंग रेट’ही ३५० दिवसांवर गेला आहे. शिवाय राज्यातील कॅज्युअल्टी रेट, सीएफआर रेट कमी झाला आहे.

कोरोना लसीकरणासाठी काही लसींची चाचणी अखेरच्या टप्प्यात आहेत. काही कंपन्यांनी लसीकरणासाठी अधिकृत परवानगीही केंद्राकडे मागितली आहे. ज्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. लसीकरणासाठी राज्यात मनुष्यबळ, यंत्रणा, कोल्डचेन अशा सर्व घटकांवर राज्याची पूर्ण तयारी झाली आहे. त्यामुळे उद्यापासूनही लसीकरण सुरु केल्यास महाराष्ट्र त्यासाठी पूर्ण तयार आहे.