कोरोना लसीकरणाबाबत अर्थसंकल्पात ‘मोठी’ तरतूद  

0
48
(प्रतीकात्मक छायाचित्र)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (सोमवारी) संसदेत अर्थसंकल्प सादर करताना  मोठी घोषणा केली आहे. सध्या भारतात पहिल्या टप्प्याचे लसीकरण सुरु आहे. या लसीकरणाचा खर्च केंद्राने उचलला आहे.  त्यासाठी ३५ हजार कोटी रुपये जाहीर केले आहेत. तर अतिरिक्त मदत करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

भारतात सध्या सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. पण करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुढच्या काही दिवसात आणखी दोन कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होतील,  असेही सीतारामन यांनी सांगितले. दरम्यान ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ या नव्या योजनेसाठी पुढील सहा वर्षांसाठी ६४  हजार १८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत गावापासून शहरापर्यंत आरोग्य सुविधा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले.