कोल्हापुरातून संग्राम देशमुख यांना मोठी आघाडी : शौमिका महाडिक

0
199

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. त्याचबरोबर भाजपच्यावतीने विक्रमी अशी मतदार नोंदणी करण्यात आली आहे. या माध्यमातून भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना जिल्ह्यातून मोठी आघाडी मिळेल, असा विश्वास भाजपच्या कोल्हापूर महिला मोर्चाच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला. पुणे मतदारसंघातील उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.

यावेळी महाडिक म्हणाल्या की, देशमुख यांच्यामध्ये पदवीधरांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची धमक आहे. संयमी, कर्तव्यदक्ष, अनुभवी असे व्यक्तीमत्व असल्याने देशमुख यांनाच मतदारांची पहिली पसंती मिळणार आहे. माजी आमदार अमल महाडिक म्हणाले की, संग्राम देशमुख यांनी अभ्यासू असून त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाचा अनुभव आहे. त्यांची आदर्श जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे.