गारगोटी (प्रतिनिधी) :  भुदरगड तालुक्यातील कोळवण येथे भातशेतीत  महाकाय आकाराचा अजगर साप आढळून आला.  सुमारे  १२ फूट लांब आणि ८० किलो वजनाच्या या अजगराला सर्पमित्र अवधूत पाटील यांनी धाडसाने पकडून त्याला वन विभागाचे ताब्यात दिले.

कोळवण गाव डोंगर,  जंगल परिसरात वसले असून जंगलातून हा अजगर भात शेतीत आला असावा.  सध्या भाताची काढणी आणि मळणी चालू आहे. या दरम्यान हा भला मोठा अजगर दिसल्याने अनेकांची भीतीने गाळण उडाली.  नागरिकांनी वन विभागाला याची कल्पना दिली.  त्यानंतर सर्पमित्र अवधूत पाटील यांनाही बोलावून घेतले,  त्यांनी धाडसाने या अजगराला पकडून  वन विभागाच्या ताब्यात दिले.  त्यानंतर  ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.