पंढरपुरातील ऑनलाइन दर्शन सुविधेबाबत ‘मोठा’ निर्णय  

0
89

पंढरपूर (प्रतिनिधी) : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने राज्यातील विठ्ठल भक्तांना मोठी खूशखबर दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली ऑनलाइन दर्शन पास सुविधा बंद करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यामुळे भाविकांना विनासायास विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ऑनलाइन दर्शन पास बुकिंगची अट समितीने रद्द केली आहे. त्यामुळे २० जानेवारीपासून मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, कोरोनाबाबतची सर्व नियमावली पाळणे यापुढेही बंधनकारक राहणार आहे. तसेच लहान मुले, ६५ वर्षापुढील लोक व गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही. तसेच भाविकांना ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाइन पास बुकिंग देखील सुरू राहणार आहे. यामुळे भाविक त्यांच्या वेळेनुसार दर्शनासाठी येऊ शकतात. दर्शन पासवर असलेल्या वेळेवर त्यांना दर्शन देण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.