पर्यटनस्थळावरील वॉटर पार्कबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय  

0
138

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात येऊ लागल्यानंतर राज्य सरकारने टप्याटप्याने उद्योग धंद्यासह पर्यटनस्थळे, चित्रपटगृहे, मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे. आता पर्यटन स्थळावरील वॉटर पार्क, जलक्रीडा आणि इनडोअर कार्यक्रमांना राज्य सरकारने सशर्त परवानगी दिल्याचे पत्रक मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसिध्द केले आहे.

याआधीच पर्यटनस्थळांना परवानगी दिली आहे. आता कंटेन्मेंट क्षेत्राबाहेर जलक्रीडा, नौकाविहार आणि मनोरंजनाचे इनडोअर कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात येत आहे. पर्यटनस्थळावरील छोट्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे येथील कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी व्यावसायिकांतून होऊ लागली होती. लॉकडाउनच्या काळात अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांना उभारी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.