खेळाडूंसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय..

0
84

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यभरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारने  क्रीडापटूंसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने विविध खेळाच्या प्रशिक्षणासाठी आता परवानगी दिली आहे. तसेच स्पर्धा देखील आयोजित करण्यास संमती दिली आहे.

आर्चरी, सायकलिंग, तलवारबाजी, शुटिंग शिवाय मध्यम संपर्क येणारे खेळ क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि बास्केटबॉल या खेळांना सराव करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील वेगवेगळी मैदाने तसेच प्रशिक्षण केंद्र आता सुरू करता येणार आहेत. सर्व प्रशिक्षण ठिकाणी १० ते १५ खेळाडू नेमून दिलेल्या वेळेत सुरक्षित अंतर लक्षात घेत वेगवेगळ्या वेळांमध्ये सराव करता येईल.

खेळाडूंसाठी किंवा त्यांचे पालक यांच्यामध्ये जर कोविडची लक्षणे आढळल्यास सरावाच्या ठिकाणी मनाई असणार आहे. त्याचबरोबर कंटेनमेंट झोनमध्ये सुद्धा परवानगी नाकारण्यात आली आहे. प्रशिक्षण असेल अथवा कोणतीही स्पर्धा आयोजित केली असेल तर सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांच्या देखील कोविडच्या चाचण्या केल्या जातील, असे निर्देशही सरकारने दिले आहे. कोरोनाची लाट जरी ओसरली असली तरीही योग्य ती सर्व खबरदारी देखील घेणे गरजेचे असल्याचे राज्य सरकारने आपल्या पत्रकामध्ये म्हटल आहे.