नवी दिल्ली  (वृत्तसंस्था) : फुटवेअर आणि कापड्यांचे दर वाढवण्यावर तूर्तास स्थगिती दिल्याने दर कायम राहिले आहेत.  तर वाढलेले दर तूर्तास थांबविण्याचा निर्णय आज (शुक्रवार) झालेल्या जीएसटी  परिषदेत घेण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

जीएसटी मध्ये ५, १२, १८ आणि २८ टक्के असे स्लॅब आहेत. ज्या वस्तूंवर सध्या ५ टक्क्के जीएसटी  आहेत. त्यापैकी काही वस्तू या १२ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये टाकण्यात येणार होत्या. मात्र, कापडावरील जीएसटी ५ टक्के वरून १२ टक्के करण्याला अनेक राज्यांचा विरोध आहे. त्यामुळे या प्रस्तावावर पुन्हा विचार करून परिषद नवीन प्रस्ताव आणणार आहे. काही वस्तूंवर लागू होणारे जीएसटी  दर नव्याने लावले जाऊ शकतात. फुटवेअर आणि कपड्याचे दर वाढवण्यास तूर्तास स्थगिती दिल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.