मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ भाजप सरपंचाचा मोठा निर्णय

0
71

मुंबई (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करून भाजपने रान उठवले आहे. तर दुसरीकडे भाजपच्या एका सरपंचाने राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सरपंच कमल नाथराव चव्हाण असे या सरपंचाचे नाव आहे. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे.  

मी कमल नाथराव चव्हाण (रा. काळवटी, ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील सरपंच म्हणून मी माझ्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. त्याचा स्वीकार करण्यात यावा. राजीनाम्याचे कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपा पक्षातील नेते वेळोवेळी महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व व बंजारा समाजातील उच्च पदस्थ लोकनेते संजय राठोड यांना संपवण्याचे कटकारस्थान करत असल्याचे मला जाणवत आहे, असा आरोप कमल चव्हाण यांनी आपल्या राजीनामा पत्रात केला आहे.