मुंबई (प्रतिनिधी) :  भारतीय क्रिकेट टिमला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. शास्त्री यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सपोर्ट स्टाफमधील तीन जणांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे.

रवी शास्त्री यांना कोरोना झाल्याने सपोर्ट स्टाफमधील चार जणांना खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेट करण्यात आले आहे. यामध्ये बॉलिंग कोंच भरत अरुण, फिल्डिंग कोच आर. श्रीधर आणि फिजीओथेरिपिस्ट नितीन पटेल यांना आयसोलेटड करण्यात आले आहे. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.