नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर व नाशिक मेट्रोसाठी निधीची घोषणा आहे.

रेल्वेसाठी १ लाख १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. रेल्वे २०३० पर्यंत हायटेक करण्यात येणार आहे. २०२३ पर्यंत राष्ट्रीय रेल्वे योजना अस्तित्वात येणार आहे. नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. टिअर-२ आणि टिअर-१ शहरातील मेट्रो सुविधा स्वस्त करण्यावर भर देण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबर २०२३ अखेर रेल्वेचे ब्रॉडगेज पूर्ण करण्यात येणारकोची मेट्रो रेल्वे दुसऱ्या टप्प्यात ११.५ किमीचे करण्यासाठी १९५७ कोटींची तरतूद केली आहे. चेन्नईच्या रेल्वेसाठी दुसऱ्या टप्प्यात ११८.९ किमीसाठी ६३.२४६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.