इचलकरंजीत मोठी कारवाई : गुटखा वाहतूक करणाऱ्या ५ जणांना अटक  

0
219

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील नदीवेस नाका परिसरातील मारगुबाई मंदिराजवळ  गुटखा वाहतूक करणारी चारचाकी आज (मंगळवार) पकडण्यात आली.  या वाहनातून वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा, सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकऱणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अजित भंडारे,  वीरभद्र कोष्टी,  रविंद्र केटकाळे, शरद बकरे, संतोष गावकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या कारवाईत एक चारचाकी गाडीसह  २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या  नेतृत्वाखालील जावेद आंबेकारी,  सुनील पाटील, सागर हारुगळे, अल्ताफ सय्यद या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.