साताऱ्यातून बिचकुलेंचा अर्ज…

0
107

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातून अद्याप एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. सातारा जिल्ह्यातून पदवीधर मतदार संघासाठी सागर शरद भिसे आणि अभिजीत वामनराव आवाडे- बिचुकले (दोन्ही अपक्ष) अशी दोन नामनिर्देशन पत्रे झाली आहेत, अशी माहिती पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

१ डिसेंबर रोजी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी १२ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची मुदत आहे. आज अखेर पदवीधर मतदार संघासाठी साताऱ्यातून दाखल झालेली दोन नामनिर्देशन पत्रे वगळता आज अखेर पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदार संघासाठी जिल्ह्यातून एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.