इचलकरंजी येथे केडीसीसीच्या ‘ई’ लॉबी इमारतीचे भूमिपूजन…

0
63

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील केडीसीसी बँकेच्या मुख्य शाखेच्या ई लॉबीच्या इमारतीचे भूमिपूजन बँकेच्या ज्येष्ठ संचालिका आणि माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे संचालक आणि आ. राजूबाबा आवळे उपस्थित होते.

यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने ई लॉबी प्रणालीविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी बँकेचे संचालक विलासराव गाताडे, इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष राहुल खंजिरे, बँकेच्या महिला विकास कक्षाच्या सौ. रंजना स्वामी, शाखाधिकारी दिपक रावळ, आर्थिक साक्षरता केंद्रप्रमुख संजय कुडचे, इंजिनियर देसाई, अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.