कुरुंदवाड (प्रतिनिधी) : जळगांव येथे महाराष्ट्र स्टेट वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हेरवाडची भूमिका मोहितेने सुवर्णपदक पटकावून प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. त्यामुळे हेरवाडचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे.

या स्पर्धेत राज्यभरातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. भूमिकाने   सुवर्णपदक पटकावून यश संपादन केल्यामुळे हेरवाडसह परिसरात तिचे कौतुक होत आहे. भूमिकाने राज्यस्तरीय स्पर्धेबरोबर आंतराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.