दरड कोसळल्याने भुईबावडा घाट वाहतुकीसाठी बंद…

0
87

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  भुईबावडा घाटात रस्त्याच्या मध्यभागी भेग पडली आहे. यातच दरड कोसळल्यामुळे भुईबावडा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे तहसिल विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे कोकणातून गगनबावडा ते कोल्हापूर वाहतुक विस्कळीत झाली आहे.

दोनच दिवसांपूर्वी भुईबावडा घाटात दरड कोसळली होती. मुसळधार पावसामुळे खारे पाटण, भुईबावडा, गगनबावडा घाटात नैसर्गिक भूस्खलन झाल्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी भेग पडली आहे. या रस्त्याचा पृष्ठभाग खचल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अवजड वाहनांना हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत सार्वजानिक बांधकाम उपविभागाकडून वैभववाडी तहसिल विभागाला पत्र देण्यात आले होते.

त्यानुसार भुईबावडा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे तहसिल विभागाकडून सांगण्यात आले आहे. यावेळी लहान वाहने आणि अत्यावश्यक सेवेची वाहतूक सुरळीत सुरु राहील, असे देखील तहसिल विभागाकडून सांगण्यात आले आहे.