भुदरगड तालुक्यात संततधार : कोल्हापूर-गारगोटी, गारगोटी-गडहिंग्लज मार्ग बंद

0
524

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे वेदगंगा नदीला महापूर आला आहे. सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कूर – मडिलगे रस्त्यावर पाणी आलेने गारगोटी कोल्हापूर मार्ग बंद झाला आहे. पांगिरे ओढ्यावर नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने गारगोटी – गडहिंग्लज मार्गही बंद झाला आहे.

सोनाळी-सालपेवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्याने गारगोटी – पुष्पनगर, मडूर रस्ता सुद्धा वाहतुकीस बंद झाला आहे. म्हसवे येथे रस्तावर पाणी आल्याने गारगोटी-म्हसवे वाहतूक बंद आहे. म्हसवे – दारवाड मार्गावरील ओढ्यावर पाणी आल्यामुळे म्हसवे – कूर वाहतूक बंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावांतील डोंगरातील घरामध्ये पाणी शिरले. भुदरगड प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की मुसळधार पावसामुळे नदी, ओढे, नाले ओसंडून वाहात आहेत. यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये.