भोसरी भूखंड प्रकरण : एकनाथ खडसेंना मोठा दिलासा

0
39

मुंबई (प्रतिनिधी) : भोसरी येथील भूखंड प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली होती. या प्रकरणाविरोधात खडसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (बुधवार) उच्च न्यायालयात होणारी सुनावणी ८ मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे खडसेंना तूर्तास अटकेपासून मोठा दिलासा मिळाला आहे.  

ईडीने ३० डिसेंबरला खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. परंतु खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याने ते चौकशीला उपस्थित राहिले नव्हते. दरम्यान, भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर ५२ मधील ३ एकर जमीन खडसेंच्या पत्नी आणि जावई यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून ३ कोटी ७५ लाख रूपयांना खरेदी केली होती. या जमिनीचे ३७ लाख मुद्रांक शुल्कही भरले होते. या सर्व प्रक्रियेनंतर ही जमिन भोसरी एमआयडीसीच्या मालकीची असल्याचे समोर आले.