साळवण (प्रतिनिधी)  : गगनबावडा तालुक्यातील कातळी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक एस के तटकरे यांनी सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार केल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अंतर्गत फंडातुन दलित वस्तीसाठी बोरवेल खोदण्यासाठी आलेला निधी हा दलित वस्तीसाठी न वापरता दोन किलो मीटरच्या अंतरावर शेतामध्ये काम करण्यासाठी वापरण्यात आला आहे. असा आरोप गामपंचायत सदस्य चंद्रकांत कांबळे यांनी केला आहे.

ते म्हणाले , ही योजना पाणीपुरवठा विभाग कोल्हापूर यांच्या अंतर्गत राबवण्यात आली होती. पण त्या ठीकाणचा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वे केला असता असे आढळून आले की त्या ठिकाणी काम झालेच नाही व गावापासून दोन किलोमीटर अंतरावर बोरवेल खोदण्यात आली होती .

याप्रकरणाची सखोल चौकशी करत असताना कांबळे यांनी विचारले असता ‘आमच्या पद्धतीने कोठे काम करायचे ते मी ठरणार असे उद्धट भाषेत ग्रामसेवक तटकरे उत्तर दिले.  गेले पाच वर्षे १५ टक्के अनुदान हे अनुसुचित लोकांना दिले जाते या ग्रामसेवकांनी ते दिलेच नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अन्याता आम्ही तीव्र अंदोलन करू असा इशारा गामपंचायत सदस्य चंद्रकांत कांबळे, बबन कांबळे, व ग्रामस्थ विजय कांबळे, श्रीकांत कांबळे आदीनी दिला आहे.