गडहिंग्लज (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाचही पातशाही पायी घालून हिंदवी स्वराज्य निर्माण  केले. त्यामुळे त्यांचे सुवर्ण सिंहासन होणे ही काळाची आहे.   सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणाची जबाबदारी सर्व धारकऱ्यांवर असणार आहे.  महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याला ही संधी मिळणार असून सर्व धारकऱ्यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन  शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे   गुरुजी यांनी आज (बुधवार) येथे केले. आजरा रोड येथील मंत्री हॉल येथे बैठकीत ते बोलत होते.   

भिडे गुरूजी म्हणाले की, शिवाजी महाराज राज्यभिषेक  झाल्या वेळी ते ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले होते.  आणि त्यांच्यावर भूपती व पृथ्वीचा पालनकर्ता म्हणून छत्र धरण्यात आले.  म्हणजेच त्यांनी भारत मातेच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि त्यांनी ती प्राणपणाने पार पाडली.  आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीने शिवचरित्र व संभाजी महाराज यांचा इतिहास वाचलाच पाहिजे, असा माझा आग्रह आहे.  माझी आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होऊ शकत नाही. त्यांना मला सांगायचे देशातील प्रत्येक शाळेत शिवछत्रपती संग्रहालय उभे राहिले पाहिजे. त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा व स्फूर्ती मिळेल.

पण शिवाजी महाराज अल्पायुषी ठरले, अवघं ५० वर्षाचे आयुष त्यांना मिळाले. शिवाजी महाराजांनी १२ बलुतेदार सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यांच्यात आपले कोण परके कोण हे ओळखण्याची जाणीव निर्माण केली.  चिनी, पाकिस्तानी आपले शत्रू आहेत, हे कायम लक्षात ठेवा.