लोकसभेतील प्रतोदपदावरुन भावना गवळी यांना हटवले

0
21

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाची लढाई आता राज्यातून थेट दिल्लीमध्ये पोहोचल्याचे चित्र आहे. आपण भाजपसोबत गेले पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना शिवसेनेने लोकसभेतील प्रतोदपदावरुन हटवले आहे. त्यांच्या ठिकाणी आता खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र शिवसेने नेते संजय राऊत यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना दिले आहे.

शिवसेनेचे संसदीय पक्षनेते खासदार संजय राऊत यांनी एक पत्र लिहिले असून, भावना गवळी यांच्याऐवजी आता राजन विचारे हे लोकसभेतील प्रतोद असतील असे या पत्रात म्हटले आहे. भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन करत शिवसेनेने भाजपसोबत गेले पाहिजे, असे म्हटले होते.