कोल्हापूर (प्रतिनिधी) :  केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आज (मंगळवार) पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्रात ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत  आहे. कोल्हापूर, पुणे, जालना, नाशिक,  नागपूरमध्ये बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. तर काही ठिकाणी शेतकरी संघटना शांततेने निषेध व्यक्त करत आंदोलन करत आहेत. बहुतांश ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहतूकही ठप्प झाली आहे. काही मार्गावरच एसटी धावत आहे. बुलढाण्यामध्ये शेतकरी संघटनेनी रेल्वे रोखून धरली आहे.  

देशभरातील सुमारे २४  संघटना आजच्या बंदमध्ये सहभागी झालेल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, तृणमूल काँग्रेस, अकाली दल, आप आदी पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या. मात्र, तोडगा काढण्यात यश आलेले नाही.   दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांनी नरजकैद केल्याचा  आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.