बीडशेडमध्ये उद्या भारत बंद आंदोलन : राजेंद्र सुर्यवंशी

0
69

सावरवाडी (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करावेत, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी उद्या गुरुवार (२६ नोव्हेंबर) पुकारलेले भारत बंद आंदोलन बीडशेड (ता. करवीर) येथे यशस्वी करणार असल्याची माहिती, काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज (बुधवारी) पत्रकारांना दिली.

संसदेत केंद्र शासनाने शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करावे, या मागणीसाठी भारत बंद आंदोलननाचा एक भाग म्हणून करवीर तालुक्यात ठिकठिकाणी भारत बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, शेकाप, भाकप यांच्यासह इतर जनसंघटना सहभागी होणार आहेत, असेही सुर्यवंशी यांनी सांगितले.