कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्यावतीने खाजगी रुग्णालयातील दाखल रुग्णांचे आकारले जाणारे दर तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना केली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकाने आज (बुधवार) महावीर कॉलेजजवळील डायमंड हॉस्पीटलला भेट देऊन रुग्णांना आकारलेल्या बिलांची शासन निममांनुसार पडताळणी केली.

अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई यांच्यासह सहा.आयुक्त संदीप घार्गे, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, वरिष्ठ लेखापरिक्षक दिपक कुंभार, लेखाधिकारी मिलिंद पाटील, परवाना अधिक्षक राम काटकर यांच्या भरारी पथकाने आज डायमंड हॉस्पीटलला भेट देऊन रुग्णांना दिल्या जाणाऱ्या बिलांची शासन नियमांनुसार पडताळणी केली. तसेच शासनाने घेतलेल्या निर्णयाची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करण्याची सुचना भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी हॉस्पीटल प्रशासनाला केली.

तसेच रुग्णांना कच्चे बिल न देता पक्के बिलच देणे बंधनकारक आहे. रुग्णांना आकारणात येणाऱ्या दराचा फलक ठळकपणे लावावा तसेच रुग्णालयात येणाऱ्या सर्वांना मास्क वापरलयाशिवाय प्रवेश देऊ नये, सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी थूंकल्यास कारवाई करावी अशा सुचनाही पथकातील अधिकाऱ्यांनी केल्या.