पैजारवाडी येथील चिले महाराज मंदिरातील भंडारा महोत्सव रद्द

0
95

बोरपाडळे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पैजारवाडी (ता.पन्हाळा) येथील प. पू. सदगुरू चिले महाराज समाधी मंदिर येथे होणारा भंडारा महोत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने रद्द करण्यात आला आहे.

दरवर्षी पैजारवाडी येथील सदगुरू चिले महाराज यांच्या कासवाकृती मंदिरात भंडारा महोत्सव आयोजित केला जातो. यावेळी आठ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमास हजारो भक्तांची गर्दी होते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पंधरा मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्यामुळे भंडारा महोत्सवात होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणीही मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केले आहे.