कोल्हापूर (प्रतिनिधी) : चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्य गुरू-शिष्य अभिनय कार्यशाळाचे आयोजन केले होते.  या कार्यशाळेची सुरूवात यशवंत भालकर यांच्या फोटोला हार तसेच नटराजाचे पुजन करून करण्यात आले. यावेळी अर्किटेक्ट चंदन मिरजकर, कलाप्रेमी उद्योजक सिध्दार्थ साळोखे, प्रा. पाठारे यांच्या उपस्थित या कार्यशाळेला सुरूवात झाली.

यावेळी नाट्यकर्मी संजय हळदीकर यांनी, अभिनय जगताना आणि अभिनेता दिग्विजय रोहिदास यांनी, एफटीआय या विषयावर नाटक, मॉडेलींग आणि चित्रपट यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच  अभिनयसाठी लागणारा प्राथमिक टप्पा संजय हळदीकर यांनी उपस्थित मुलांच्याकडून करून घेतला. दिग्विजय यांनी ऑडिशन एक प्रवास आणि कलाकार होण्यासाठी लागणारी मेहनत कशी करावी हे महत्व सांगितले. या परिसंवादाचे सुत्रसंचालन केतकी जमदन्गी यांनी केले.

तर कोल्हापूरच्या युवा कलाकारांना एक नवी ऊर्जा मिळावी आणि योग्य तो मार्ग मिळावा हा या कार्यशाळेचा हेतू असल्याचे नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर यांनी सांगितले.

यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष संदिप भालकर, उपाध्यक्ष सपना जाधव- भालकर, कोल्हापूर डान्स असोशिएशनचे सचिव कोळी, अविनाश गायकवाड, श्रध्दा शुक्ल, भालकर्स कला अकादमीचे अशिष हेरवाडकर, विजय कांबळे, प्रियंका कुंभार, मनाली संकपाळ, साक्षी गायकवाड, अनुप जोशी, कॅमेरामन सैफ बारगीर, अमित कातवरे, विद्यार्थी उपस्थित होते.