सावरवाडीतील भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा साधेपणाने…

0
127

सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील सावरवाडी येथील ग्रामदैवत  भैरवनाथ मंदीरात जन्मोत्सव सोहळा साध्या पध्दतीने आज (सोमवारी) साजरा करण्यात आला. यावेळी मंदीरात पहाटे पाचच्या सुमारास महाअभिषेक, आरती, भजन आदी धार्मिक विधी पार पडल्या. दुपारी बारा वाजता मुख्य मंदीरातून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी भंडारा आणि गुलालाची उधळण करीत धनगरी ढोलांच्या निनादात गावची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. तसेच संध्याकाळी सात वाजता मंदीरात जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी आतिषबाजीही करण्यात आली.