नंदगावच्या सरपंचपदी भगवान चांभार तर उपसरपंचपदी मयुरी नरके बिनविरोध…

0
256

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील नंदगावच्या सरपंच पदी चौगले गटाचे भगवान चांभार तर उपसरपंचपदी नरके गटाच्या मयुरी  नरके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी धनाजी पाटील यांनी कामकाज पाहिले.

सरपंच पदासाठी भगवान चांभार यांच्या नावासाठी मंगल चौगले या सूचक होत्या. तर उपसरपंच पदासाठी मयुरी नरके यांच्या नावासाठी रूपाली चौगले या सूचक होत्या. सरपंच आणि उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली.यावेळी ग्रामसेवक सुरेश हासुरे, प्रशासक किशोर आयरे, सदस्य, कार्यकर्ते  उपस्थित होते.