सुळगाव तिट्टयाजवळ अपघात : भडगावच्या व्यापाऱ्याचा मृत्यू…

0
651

आजरा (गडहिंग्लज) : आजरा-गडहिंग्लज रोडवर सुळगाव तिट्टयाजवळ मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात कांद्याच्या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. कलगोंडा शिवगोंडा पाटील (वय ४८, भडगाव) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात आज (शुक्रवार) सायंकाळी घडला आहे. आजच्या दिवसात घडलेला हा दुसरा अपघात आहे.