‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त व्हायरल लिंकपासून सावधान..!

0
389

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त फ्री कूपन अथवा फ्री गिफ्ट कार्ड मिळत असल्याची लिंक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरी अशा कोणत्याही प्रकारच्या लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.   

‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त ऑनलाईन खरेदीसाठी वेगवेगळ्या ऑफरचा वर्षाव होऊ लागला आहे. तरी ही खरेदी करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. फ्री कूपन आणि फ्री कार्ड संबंधी प्राप्त अनोळखी लिंक क्लिक करू नये. त्याचबरोबर ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त मुंबईतील ताज हॉटेलमध्ये ७ दिवस राहण्यासाठी फ्री कूपन अथवा फ्री गिफ्ट कार्ड मिळत असल्याची लिंक सोशल मीडियावर फिरत आहे. पण अशी कोणतीही ऑफर दिलेले नाही, असे ताज हॉटेलने स्पष्ट केले आहे. तरी लिंक ओपन करून  नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.