गडहिंग्लजमध्ये दोन योजनेचा १३२ लाभार्थ्यांना लाभ

0
41

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार योजनेची मासिक बैठक पार पडली. समितीचे अध्यक्ष अमर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत, अपंग अशा अशा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ४७ अर्ज मंजूर करण्यात आले. श्रावणबाळ सेवा राज्य निवृती वेतन योजनेअंतर्गत १९ अर्जांना मंजुरी देण्यात आली.

दोन्ही योजनेत मिळून एकूण ६६ नव्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार असून, विविध कारणांनी दोन्ही योजनांमधील ७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात ३० मे रोजी झालेल्या सभेत आणि आजच्या सभेत मिळून दोन्ही योजनामध्ये १३२ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे.

या सभेत हारूण सय्यद यांनी अपंगांच्या उत्पन्न दाखल्यावरून प्रशासनास धारेवर धरले. चव्हाण आणि सय्यद यांच्यासह रोहिणी भंडारे, रमजान अत्तार, बाळेश नाईक, सिदगोंडा पाटील या संजय गांधी निराधार योजना समितीच्या पदाधिकारी सदस्यांसह तहसीलदार दिनेश पारगे, महसूल विभागाचे अव्वल कारकून विकास कोलते, जावेद बागवान, लखन खाडे, ज्योत्स्ना खोराटे आदी उपस्थित होते.