संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांना मिळावी : शिष्टमंडळाची मागणी

0
99

इचलकरंजी (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजूरी मिळूनही वर्षभरापासून तर जुन्या लाभार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून अनुदानच मिळाले नाही. त्यामुळे या निराधार लाभार्थ्यांची ससेहोलपट होत आहे. याप्रश्‍नी तातडीने लक्ष घालून निराधारांना न्याय मिळवून द्यावा, अशा मागणीचे निवेदन आज (सोमवार) इचलकरंजीत आ. प्रकाश आवाडे यांना शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आले.

यावेळी आमदार आवाडे यांनी या प्रश्‍नासंदर्भात लवकरात लवकर प्रांताधिकारी आणि तहसिलदारांच्या सोबत बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावू, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.

यावेळी सुखदेव माळकरी, कोंडीबा दवडते, विद्या सुतार, बाळासो जाधव, रोहिणी पोळ, बाबुराव जाधव, वत्सला पाटील उपस्थित होते.