पोखले येथे घंटागाडीचा लोकार्पण सोहळा

0
13

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पोखले येथील ग्रामपंचायतीच्या घंटागाडीचा लोकार्पण सोहळा आ. विनय कोरे यांच्या उपस्थितीमध्ये झाला.

पोखले येथे ग्रा.पं.च्या वतीने घेतलेल्या घंटागाडीचा लोकार्पण सोहळा आज (शनिवार) झाला. पोखले ग्रामपंचायत हद्दीमध्ये ३५०० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात दररोज मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होते. घरोघरी जाऊन ओला, सुका कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडीची सुविधा उपलब्ध करण्यासाठी मागील वर्षभरापासून ग्रामस्थातून मागणी होत होती. सुमारे ६ लाख रु. खर्चून आ. विनय कोरे यांच्या हस्ते घंटागाडीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पोखलेचे सरपंच डॉ. पांडुरंग निकम, जयसिंग पाटील, भीमराव माने, कुमार मगदूम, रमजान पठाण, दादासो नाईक, शिवाजी जाधव, माजी ग्रामसेवक शशिकांत निकम, संदीप निकम, गोंविद पाटील, बी. आर. पाटील, सभांजी पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.