‘बेळगांव आमच्या हक्काचं’… : गडहिंग्लजमध्ये जनता दलाचा मोर्चा…(व्हिडिओ)

0
1028

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या काही बसेसवर निपाणी येथे काल (रविवार) गडहिंग्लज कर्नाटकात सामील करा, अशा आशयाचे फलक लावण्यात आले. त्यामुळे गडहिंग्लजमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावेळी गडहिंग्लजचे उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला.

याचा निषेध करण्यासाठी आज (सोमवार) गडहिंग्लजमध्ये जनता दलाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यामध्ये जनता दलाचे नगरसेवक सहभागी झाले होते. असे फलक कोण लावले असतील, त्यांच्यावर गुन्हे नोंद करा अशी मागणी प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.