‘लागिरं झालं जी’ मालिकेमधील ‘जिजी’ काळाच्या पडद्याआड

0
102

मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका कमल ठोके यांचे   शनिवारी (दि.१४) बंगळुरू येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ऐन दिवाळी दिवशी  त्यांचे निधन झाल्याने मालिका विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर कराड येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

झी मराठीवरील  लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील त्यांनी ‘जिजी’ नावाची आजीबाईची  व्यक्तीरेखा साकारली होती.  आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्यांनी घर केले होते. कमल ठोके यांनी शिक्षकी पेशा सांभाळात मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. सासर माहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून नातवंडं, मुलगी असा परिवार आहे. झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेतही त्यांनी काम केले आहे.