शिवाजी विद्यापीठ परिसरात मधमाशांचा नागरीकांना त्रास…

0
42

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठ परिसरात झाडांवर मधमाशांची अनेक पोळी आहेत. या पोळ्यातील मध खाण्यासाठी काही पक्षी या पोळ्यांकडे येतात. त्यामुळे मधमाशा चवताळून या परिसरात फिरायला येणाऱ्या लोकांना चावतात. आजही काहीजणांना मधमाशा चावल्या. प्रशासनाने यावर तोडगा काढावा अशी मागणी नागरीकांतून व्यक्त होत आहे.

विद्यपीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूच्या झाडांवर मधमाशांची अनेक पोळी आहेत. गर्द झाडीमुळे ही पोळी दिसत नाहीत. घारीसारखे काही पक्षी मध खाण्यासाठी या पोळ्यांवर झडप घालतात. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मधमाशा चवताळतात. शेकडो मधमाशा दिसेल त्याच्यावर हल्ला करतात. त्यामुळे अनेकांची पळताभुई थोडी होते. सकाळी आणि सायंकाळी अनेक ज्येष्ठ नागरिक विद्यापीठाच्या परिसरात फेरफटका मारत असतात. अशावेळी मधमाशांनी हल्ला केल्यास त्यांना पळताही येत नाही.

या मधमाशांची पोळी काढण्याचा प्रयत्न केला. पण, तेथून दुसऱ्या झाडावर मधमाशा नवे पोळे तयार करतात. मधमाशांना न मारता त्या सुरक्षित रहातील, पक्षांपासून त्रास होऊ नये, याची खबरदारी घेत योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांतून होत आहे.