Published August 9, 2023

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील गोगवे येथे पुतण्याच्या दारात येऊन वादावादी का करत आहात, असे विचारल्यामुळे तिघांना मारहाण करण्यात आली. यासाठी पोलीसांनी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद उदयसिंग चंद्रकांत पाटील (वय ३४, रा.गोगवे) यांनी कळे पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी उदयसिंग पाटील हे सकाळी साडे नऊच्या दरम्यान शेतातून वैरण घेऊन आले होते. त्यांना पुतण्या पृथ्वीराज पाटील यांच्या दारात विनोद बापू पाटील, रंगराव सखाराम पाटील हे हातात काठ्या घेऊन वाद घालत असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांना विचारणा केली असता विवेक कृष्णा पाटील, मधुकर तुकाराम पाटील, दशरथ महादेव पाटील, अविनाश मारुती पाटील यांनी काठीने फिर्यादीस उजव्या हातावर, डोक्यात मारहाण करत जखमी केले. तसेच त्यांचे चुलत भाऊ विक्रम बबन पाटील व पृथ्वीराज संभाजी पाटील हे सोडवण्यासाठी आले असता इतर काहीजणांनी त्यांनाही शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण करत फिर्यादीची मोटरसायकल एम.एच-०९ डी.सी.२६४२ या गाडीचे आरोपींकडून दगड,विटा मारुन नुकसान केले. जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

फिर्यादी उदयसिंग पाटील हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. यानुसार संशयित आरोपी विनोद बापू पाटील, रंगराव सखाराम पाटील, दशरथ महादेव पाटील, विवेक कृष्णात पाटील, मधुकर तुकाराम पाटील, अविनाश मारुती पाटील, आकाराम बंडू पाटील, राऊ भाऊ पाटील, मारुती लक्ष्मण पाटील ,सर्जेराव कृष्णात पाटील, संस्कार प्रदीप पडवळ सर्व (रा.गोगवे) अशा अकरा जणांविरोधात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023