दारूला पैसे देण्यास नकार देणाऱ्या तरुणास मारहाण

0
66

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दारूला पैसे दिले नसल्याचा रागातून झालेल्या मारहाणीमध्ये तरुण जखमी झाला. योगेश भगवान गणेशाचार्य (वय २७, रा. शिंगणापूर ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांने संदीप उर्फ चिनू हलदकर व आदी हवालदार (दोघे रा. दौलतनगर) यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शिंगणापूर येथील योगेश गणेशाचार्य हा रात्रीच्या सुमारास कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील काही कामानिमित्त थांबला होता. त्यावेळी या ठिकाणी आलेल्या संदीप उर्फ चिनू हळदकर व आदी हवालदार या दोघांनी योगेश गणेशाचार्य याच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. पण पैसे देण्यास योगेश गणेशाचार्य याने नकार दिला. या रागातून हलदकर व हवालदार या दोघांनी त्याला बेदम मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी संदीप उर्फ चिनू हळदकर व आदी हवालदार या दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.