केडीसीसीचे माजी व्हा. चेअरमन आप्पी पाटील यांचा मदतीचा हात…

0
329

आजरा (प्रतिनिधी) : केडीसीसी बँकेचे माजी व्हा. चेअरमन आप्पी पाटील यांनी चंदगड तालुक्यातील अलबादेवी येथील मनोहर पुंडलिक शिवनगेकर यांना ५१ हजारांची आर्थिक मदत देऊ केली आहे. शिवनगेकर यांच्या   राहत्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराचे तसेच संसारपयोगी  साहित्यांचे असे १० लाखांचे नुकसान झाले होते. त्यांचा हा मोडलेला संसार उभा करण्यासाठी वैभव शिवनगेकर यांना ही मदत देऊ केली आहे.

अलबादेवी येथे तीन दिवसांपूर्वी शिवनगेकर यांच्या घरी स्वयंपाकाच्या सिलेंडरचा स्फोट झाला होता. यावेळी त्यांचे घराचे तसेच ५० हजारांच्या  रकमेसह जीवनावश्यक वस्तूंचे असे १० लाखांचे नुकसान झाले होते, यावेळी त्यांना मदतीचे आवाहन केल्यानंतर समाजातील काही दानशूर व्यक्तींनी आपआपल्या परीने मदत जाहीर केली. यावेळी वैभवला महागांव येथील केडीसीसी बँकेचे माजी व्हा. चेअरमन आप्पी पाटील यांना भेटण्याचा सल्ला दिला. वैभव हे आप्पी पाटील यांना भेटल्यानंतर पाटील यांनी वैभवच्या कुटुंबाची चौकशी करत त्याला ५१ हजारांची आर्थिक मदत देऊ केली.

यावेळी गोड साखरचे संचालक संभाजी नाईक, माजी सरपंच तानाजी निकम, विजय नाईक, ग्रा.पं. सदस्य श्रीशैल पाटील, सोमनाथ पाटील, अर्जुन दिवटे, अनिल घेवडे, सोनू आर्दाळकर, किशोर आसबे, नजीर खलिफ, शिवाजी कोकितकर, दत्ता गोरुले, मल्लेश देशनुरे आदी उपस्थित होते.