नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ मर्यादीत सामन्यांची मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. या मालिकेसंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. 13 जुलैपासून सुरू होणारी या मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून या मालिकेला आता १८ जुलैपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी दिली.

श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि डेटा अॅनालिस्ट यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेता या मालिकेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला १३ जुलैऐवजी १८  पासून सुरुवात होणार आहे. श्रीलंका संघातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जय शहा यांनी वृत्तसंस्थेला दिली.

श्रीलंका-भारत मालिकेचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

एकदिवसीय मालिका –

पहिला सामना – १८ जुलै, दुसरा सामना – २० जुलै, तिसरा सामना – २३ जुलै

टी-20 मालिका –
पहिला सामना – २५ जुलै, दुसरा सामना – २७ जुलै, तिसरा सामना – २९ जुलै