बार्वे-भुदरगड रस्ता लवकरात लवकर करावा : अर्जुन आबिटकर

0
133

पिंपळगांव  (प्रतिनिधी) :  गेली अनेक वर्षे बार्वे ते भुदरगड हा रस्ता प्रलंबीत आहे. यासाठी भुदरगड प्रतिष्ठानने बरीच आंदोलने केली. याबाबत लोकप्रतिनिधी, वन विभाग, बांधकाम विभाग यांची भेट घेतली होती. याबाबत माजी जि.प.सदस्य अर्जुन आबिटकर यांनी वन विभाग आणि बांधकाम विभाग आणि वन खात्याच्या संबंधीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच दहा फेब्रुवारीपर्यंत या रस्त्याचे काम सुरु करण्यास संगितले.

भुदरगड प्रतिष्ठानने सुरु केलेल्या आंदोलनामुळे आज (मंगळवार) हा रस्ता पाहणी करण्यात आली. हा रस्ता लवकर पुर्ण नाही झाला तर मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा अध्यक्ष दयानंद भोईटे, अशोक गुरव यांनी दिला. या रस्त्याची पाहणी करण्यासाठी अर्जुन आबिटकर,वन क्षेत्रपाल आहिरे, बांधकाम विभागाचे कुंभार, सातपुते यांनी केली.

यावेळी जकिनपेठचे सरपंच संभाजी नलगे, अरुण बेलेकर, मल्हार फौंडेशनचे संजय पौळकर, बार्वेचे ग्रा.प.सदस्य, भांडेबांबरचे उपसरपंच भीमराव रेडेकर,राजू भारमाल, विध्याधर परिट, रामभाऊ शिउडकर आदी उपस्थित होते.