मुंबई (प्रतिनिधी) : ऑगस्ट महिना सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार बॅंकेचे व इतर महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करतात. बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी ऑगस्ट महिन्यात कामाच्या दिवसांपेक्षा सुट्ट्याच जास्त आहेत. त्यामुळे खातेधारकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

आरबीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. या यादीनुसार ऑगस्ट २०२२ मध्ये १३ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. ऑगस्ट महिन्यात देशाच्या विविध भागात सण साजरे केले जातात. यामध्ये स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी यासारख्या सणांचा समावेश आहे. बॅंका बंद असताना ग्राहक इंटरनेट बॅंकिंग, नेट बॅंकिंग आणि इतर सेवा वापरव्यात, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.

बॅंकासाठी असणाऱ्या सुट्या :  १ ऑगस्ट- द्रुपका शे-जी उत्सव (गंगटोकमध्ये सुट्टी),  ७ ऑगस्ट- रविवार, ८ ऑगस्ट- मोहरम (जम्मू काश्मीरमध्ये बॅंका बंद), ९ ऑगस्ट- चंदीगड, गुवाहाटी, इंफाळ, डेहराडून, शिमला, तिरूवनंतपुरम, भुवनेश्वर, जम्मू, पणजी, शिलॉंग वगळून मोहरम निमित्त देशातील बॅंका बंद राहतील., ११ ऑगस्ट- रक्षाबंधन, १३ ऑगस्ट- दुसरा शनिवार, १४ ऑगस्ट- रविवार, १५ ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन, १६ ऑगस्ट- पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी),  १८ ऑगस्ट- जन्माष्टमी, ऑगस्ट- रविवार, २८ ऑगस्ट- रविवार, ३१ ऑगस्ट- गणेश चतुर्थी (महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकमध्ये बॅंका बंद)