बँकिंग शेअर्समध्ये घसरण सुरू

0
11

मुंबई : आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात संथ सुरुवात पाहायला मिळाली. संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजार आज सलग दुसऱ्या दिवशी दबावाखाली होता. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी व्यवहारात संथ व्यवहार पाहायला मिळाला.

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १०० अंकांनी वाढीसह सुरु झाला. त्यानंतर विक्री सुरू झाली आणि सेन्सेक्स गडगडला. सध्या सेन्सेक्स ४८.५६ अंकांनी घसरून ५७,८७६.७२ अंकांवर पोहोचला आहे. निफ्टी २५.७५ अंकांनी घसरून १७,०५१.१५ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात आयटी शेअर्स मजबूतीसह व्यवहार करताना दिसत आहेत. एक्सेंचरमधील १९००० नोकर कपातीच्या बातमीनंतर ही तेजी आली असल्याचे मानले जात आहे. सुरुवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया ४ पैशांनी घसरून ८२.२४ रुपयांवर बंद झाला.