मुंबई  (प्रतिनिधी) : बँकेतील काही महत्त्वाची कामे पुढील ३ दिवसांमध्ये करून घ्या, अन्यथा आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. कारण २७ मार्च ते ४  एप्रिलच्या कालावधीत बँका केवळ १ दिवसांसाठी सुरू राहणार आहेत. त्यामुळे या ३ दिवसांत बँकेची कामे उरकून घ्या.

महिन्याच्या दुसर्‍या आणि शेवटच्या शनिवारी बँकांना सुट्ट्या आहेत. २७ तारखेला शेवटचा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. २८ तारखेला रविवार असल्याने  साप्ताहिक सुट्टी असेल. तर २९ तारखेला धुलीवंदन आहे. त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहतील.  म्हणून बँकांचे आर्थिक व्यवहार आताच उरकून होणारी गैरसोय बँक ग्राहकांनी टाळावी.  

२७ मार्च महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी बँक बंद असेल. २८ मार्चला रविवार आहे. तर २९ मार्चला होळीची बँकांना सुट्टी  आहे. ३० मार्चला बँका खुल्या राहतील. तर  ३१ मार्च आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोणतेही सार्वजनिक व्यवहार केले जाणार नाहीत. १ एप्रिलरोजी नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस आहे. तर  २ एप्रिलला गुड फ्रायडेमुळे बँका बंद असतील. ३ एप्रिलरोजी बँक बंद राहिल.  ४ एप्रिलला रविवारची सुट्टी असेल.