बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून दोन दिवस संप

0
126

मुंबई (प्रतिनिधी) : आयडीबीआय आणि दोन खासगी बँकांचे  खासगीकरण केले जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी  आजपासून (सोमवार) दोन दिवसांचा संप पुकारला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँका,  खासगी, ६ विदेशी, ५६ प्रादेशिक ग्रामीण बँकेतील १० लाखांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपात सहभागी होणार आहेत.  

संपाची सुरुवात सकाळी सहा वाजल्यापासून सेवा शाखा ज्या चेक क्लिअरिंगचे काम पाहतात तेथून होईल. मंगळवारी (१६ मार्च) रात्री बारापर्यंत हे कामकाज बंद राहील. या संपात बँकेत काम करणारे सफाई कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक अशा सर्व श्रेणीतील अधिकारी सहभागी होणार आहेत.  

या संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनस कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटना सहभागी होत आहेत.