कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळा, विशाळगडासह सर्व किल्ल्यांवरील दारु, अमली पदार्थ बंदीची अमंलबजावणी काटेकोरपणे तातडीने करण्यात यावी. अशी मागणी आज (मंगळवार) शिवदुर्ग संवर्धन आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.

यावेळी गडकिल्ल्यांवर अशी कृती करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी. अन्यथा शिवभक्त या विरोधात तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा ही यावेळी हर्षल सुर्वे यांनी दिला. दरम्यान, याबाबत डीपीडीसीमध्ये तरतूद करून गडकिल्ल्यांवर सूचना फलक लावले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई दिले.

यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत,अमित आडसुळे,सुशांत हराळे,चैतन्य अष्टेकर, संघटनेचे पदाधिकारी, शिवभक्त उपस्थित होते.