भारतात आंतरराष्ट्रीय विमानांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी

0
128

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या प्रकाराच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने आज (बुधवार) घेतला आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आधी ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र, आता ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर    आंतरराष्ट्रीय विशेष विमाने आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये तयार झालेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचा आता भारतामध्येही झपाट्याने संसर्ग होत असल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटनमधून देशात परतलेल्या नागरिकांपैकी २० जणांना या विषाणूची लागण झाली आहे. यापैकी ८ रूग्ण दिल्लीमधील आहेत. त्यामुळे प्रशासनाने धास्ती घेतली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.