अमिताभ बच्चनच्या ‘या’ चित्रपटावरील बंदी कायम

0
69

मुंबई (प्रतिनिधी) : महानायक अमिताभ बच्चन यांच्या आगामी ‘झुंड’ चित्रपटावरील  बंदी उठविण्यास  सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध दाखल केलेली याचिका फेटाळत न्यायालयाने ही बंदी कायम ठेवली आहे.

कॉपीराईट केल्याप्रकरणी  या  चित्रपटाच्या प्रदर्शनावर तेलंगणा न्यायालयाने बंदी घातली आहे. हैदराबादस्थित लघुपट निर्माता नंदी चिन्नी कुमार यांनी चित्रपट निर्मात्यांवर कॉपीराइट उल्लंघन केल्याचा आरोप ठेवला आहे. तर, निर्मात्यांनी  आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, सुनावणीदरम्यान खंडपीठाने मनोरंजक प्रकरण असल्याची टिप्पणी करत पुढील सहा महिन्यामध्ये हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.