गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अविरत पणे झगडणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (शनिवार) जयंती आहे. या निमित्त गडहिंग्लज येथील दसरा चौकातील शिवसेनेच्या मुख्य शाखेजवळ  तहसीलदार दिनेश पारगे, पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी तालुका सहसंपर्कप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. अनेक जाती-धर्मांशी त्यांचे मित्रतवाचे संबंध होते. आज मराठी माणसाला जो न्याय, सन्मान मिळतो आहे, तो केवळ बाळासाहेब यांच्या मुळेच मिळत आहे. त्यांनी  केलेल्या मार्गदर्शना नुसार पुढील वाटचाल आपल्याला करायची आहे.

यावेळी तालुका प्रमुख दिलीप माने, रियाजभाई शमणजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले, सागर कुराडे, मनोज पोवार, काशिनाथ गडकरी, वसंत शेटके, सचिन प्रसादे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.