बाजीराव पाटील यांचा खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते सत्कार

0
184

टोप (प्रतिनिधी) : शिये येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच शिये शिवसेना नेते बाजीराव पाटील यांची कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाली होती. यामुळे हातकणंगले विभागाचे खासदार धैर्यशील माने यांनी बाजीराव पाटील यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार केला. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी हातकणंगले पंचायत समिती माजी सभापती डॉ .प्रदीप पाटील, शिवसेना नेते तानाजी पाटील, विजय भोसले, उत्तम पाटील, सुरेश पाटील, अमोल पाटील, शिवाजी चव्हाण, सागर पाटील, सुरेश भोसले, संदीप पाटील यासह नागरीक उपस्थित होते.